राज ठाकरेंचे चिरंजीव ‘अमित ठाकरे’ लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून, अनेक बलाढ्य देश कोरोना पुढे हतबल झाले. दरम्यान, सध्या तरी कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखांच्या वर पोहचला आहे. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अश्यातच मसने अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरेंना उपचारासाठी वांद्रे येथील लिलावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमित यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केली असता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मलेरिया चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता घाबरण्याचं काही एक कारण नाही असं डॉक्तरांनी सांगितलं आहे. परंतु खबरदारी म्हणून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.