भारतीय हवाई दलाच्या #AirStrike वर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

पुणे –  पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करत जवळपास ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यानंतर भारतीय वायुदलाचं कौतुक करत राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो.

दरम्यान पुलवामा हल्ल्यानंतर पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.