चर्चा तर होणारच ! राज्यपालांची राज ठाकरे घेणार भेट

मुंबई –  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी पत्रात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.  आता यातच  राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबतही राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतला होता.  राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, राज ठाकरे लोकांच्या प्रश्नासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज  भेट घेणार आहेत.लॉकडाऊन काळात अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकांनी  राज ठाकरेंची भेट घेतली होती. यात मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरचे पुजारी, ज्येष्ठ नागरिक, कोळी महिला, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, महिला बचत गट अशा अनेक लोकांनी राज ठाकरेंकडे मदतीसाठी विनवणी केली होती.

तत्पूर्वी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी पत्रात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राज्यपालांना या शब्दांशिवाय चांगले शब्द वापरू शकले असते असे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.