राज ठाकरेंनी मानले मोदींचे मनापासून आभार

मुंबई –  कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील. राज्यात वाढता  कोरोनाचा वाढता कहर पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. ह्या पत्रात राजसाहेबांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत. राज ठाकरेंनी केंद्र सरकारकडे महत्वाचे मुद्यावर मागण्या केल्या होत्या.  या मागणीला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्याबद्दल राज यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे की,‘१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी, ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की,’ असं राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल राज ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.