‘पानिपत’ चित्रपटाविषयी राज ठाकरे म्हणतात…

मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचे पोस्टर त्यांनी ट्विट करत  प्रदर्शित केले.


तर काही दिवसांपूर्वी गोवारीकर यांनी पानीपत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. हा चित्रपट मराठा साम्राज्याचा अस्त ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे.


एकीकडे पानीपत चित्रपटातील संपूर्ण टीम या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे तर याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.


राज ठाकरे यांनी ट्विट केले की,’पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा अविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन्‌ अटकेपार झेंडा नेणारी मराठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतची लढाईकडे पहावंच लागेल.गोवारीकर यांचा पानिपत चित्रपट हा प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे संपूर्ण भारतीयांनी पाहावा’,असं आवाहन राज ठाकरेंनी केली.


दरम्यान, या चित्रपटात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या प्रमुख मुख्य भूमिका आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.