Raju Patil : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमातून राज ठाकरे यांनी “कल्याण-डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली, नुसता बाजार मांडलाय,” असे विधान केले होते. यानंतर आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ही युती सत्तेसाठी नव्हे तर मनसेचे नगरसेवक वाचवण्यासाठी केल्याचा दावा राजू पाटील यांनी केला आहे. “मनसेच्या नगरसेवकांना सातत्याने भाजपकडून फोन येत आहेत. फोडाफोडीचे राजकारण खुलेआम सुरू आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक फुटू नयेत, पक्ष टिकून राहावा यासाठीच आम्हाला शिंदेसेनेशी युती करावी लागली, ” अशी युतीमागची भूमिका राजू पाटील यांनी सांगितली. हेही वाचा :Imtiaz Jaleel Statement : इम्तियाज जलील यांचा सहर शेखला पाठींबा; सोमय्यांवर टीका करत म्हणाले, “तोतला येतो आणि….” महापालिका निवडणुकीनंतर विविध ठिकाणी सत्तास्थापनेसाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशीच एक मोठी घडामोड कल्याण डोंबिवली महापालिकेत घडली आहे. मनसेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून.. “आम्ही शिंदेसेनेला फक्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सत्तेत सहभागी झालेलो नाही. सत्तेत जायचं असेल तर स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो. तसं काहीही केलं नाही. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे, असे राजू पाटील म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे कल्याण- डोंबिवलीमध्ये शिंदे सेना आणि मनसे यांच्यात युती झाली असून शिंदेसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. ही अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. यामुळे महायुतीतही नवीन समीकरणे पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिंदे सेनेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला आहे. यामुळे शिंदे सेनेला ५८ पेक्षा अधिक जागांचे बहुमत मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की ही पाठिंबा फक्त विकासासाठी आहे, सत्तेसाठी नव्हे. असे ते म्हणाले आहेत. हेही वाचा : Sindhudurg District : भाजपचा बिनविरोध पॅटर्न कायम! निवडणुकीपूर्वीच उधळला विजयाचा गुलाल