पुणे – प्रविण गायकवाड यांच्या नंतर श्रीमंत कोकाटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली त्यावरून पुण्यात मनसे चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळाली आहे. तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत, तुम्ही तर दळीद्री विचाराचे आहात असा टोला कोकाटे यांना मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी लगावला आहे.
रुपाली पाटील म्हणाल्या की, श्रीमंत नाव लावून कुणी श्रीमंत होत नसते, विचाराने, कृतीने श्रीमंत असावे लागते. तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत, तुम्ही तर दळीद्री विचाराचे आहात असा निशाणा त्यांनी कोकाटेंवर लगावला आहे.
श्रीमंत कोकाटे यांनी मसने अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी देशात लोकशाही आहे. आपल्याकडे अफगाणिस्तान सारखं तालिबानी राज्य आलेले नाही. राज ठाकरेंना दादरमध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे. तसेच प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना? त्यामुळे पुणे कोणाच्या बापाचं नाय हे मनसेने लक्षात ठेवावं. मनसेच्या राज ठाकरेंना वाटत असेल की पुरंदरेना लोटांगण घातले म्हणून आपण खूप मोठे झालो. तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो असं श्रीमंत कोकाटे म्हणाले होते.
दरम्यान, मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी कोकाटे यांच्यावर सडकून टीका केली आहे.