कोलकाता: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. आज दुपारी राज्य सचिवालय नबाना येथे या दोन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. निवडणुकांमध्ये वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिनसंदर्भात ममताजींची भेट घेतल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले, ईव्हीएम मशिनसंदर्भात ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा केली. तसेच मी त्यांना मुंबईमध्ये ईव्हीएम विरोधात निघत असलेल्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांनी त्यांची पार्टी लोकशाही वाचवण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे सांगितले.
ईव्हीएम विरोधात न्यायालयात जाणार का ? असा प्रश्न राज ठाकरे यांना केला असता. राज ठाकरे म्हणाले हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि निवडणुक आयोगाकडून मला अपेक्षा नाही.
Raj Thackeray, Maharashtra Navnirman Sena (MNS) on being asked if he will move Court against EVMs: I have no expectations from High Court, Supreme Court and the Election Commissioner. pic.twitter.com/2NVtqXZ3eI
— ANI (@ANI) July 31, 2019