महाराष्ट्रसाठी राज ठाकरेंनी मोदी सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

मोदींच्या उत्तराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

मुंबई –  कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील. राज्यात वाढता  कोरोनाचा वाढता कहर पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. ह्या पत्रात राजसाहेबांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत. राज ठाकरेंनी केंद्र सरकारकडे महत्वाचे मुद्यावर मागण्या केलेल्या आहे.

काय आहे पत्रातील महत्वाचे मुद्दे

 

-महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या

-राज्यातील खासगी संस्थानांही लसी खरेदी करता याव्यात

-सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी

-लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी

-कोविड १९ रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा पुरेसा साठा राज्यात असावा यासाठी राज्याला आवश्यक पाऊलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

महाराष्ट्रातील कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील ह्यासंबंधी मा. राजसाहेब ठाकरे ह्यांनी…

Posted by MNS Adhikrut on Tuesday, April 13, 2021

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.