मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.
अपेक्षेप्रमाणे भव्य सेट्स, युध्दाचे आक्रमक प्रसंग, डायलॉगबाजी, अॅक्शन आणि लव्हस्टोरी यांचा त्रिवेणी संगम यामध्ये असल्याचे दिसून येते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला सर्वच स्थरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून ट्विट करत चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा केली आहे.
“दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला.
ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण चित्रपट देखील नक्की पहा”. असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण चित्रपट देखील नक्की पहा https://t.co/UOjrNjiH3L
— Raj Thackeray (@RajThackeray) November 10, 2019