अहमदनगर – वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या राज्यातील होत असलेल्या सभांवरुन लक्ष्य करत, मनसेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसताना, राज ठाकरे कोणासाठी सभा घेत आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही, तरीदेखील ते कोणत्या कारणामुळे सध्या सभा घेत असल्याचे विचारत प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी लग्न त्यांच्या घरामध्ये नाही, तरी पण राज ठाकरे विनाकारण नाचत आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला.