राज ठाकरे भांडारकर संस्थेत…

संभाजी महाराजांविषयीच्या चरित्राचे केले प्रकाशन

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि एकूणच इतिहासप्रेम सर्वश्रुतच आहे. याशिवाय त्यांच्या भाषणांमधूनही ते अनेकदा इतिहासातील दाखले देत असतात. सध्याच्या काळात राजकारण आणि लॉकडाऊनमुळे अनेक तळागाळातील संघटना, संस्थांचे प्रश्‍न सोडवण्याचा ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यातूनच त्यांनी पुण्यात शुक्रवारी वेळ काढून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला भेट दिली. निमित्त होते केदार फाळके यांनी संभाजी महाराजांविषयी लिहिलेल्या चरित्राच्या प्रकाशनाचे!

या भेटीत ठाकरे यांनी संस्थेच्या संशोधन प्रकल्पांची माहिती घेतली. संस्थेतील पदाधिकारी श्रीकांत बहुलकर, श्रीनिवास कुलकर्णी, श्रीनंद बापट यांनी राज यांना माहिती दिली. यावेळी प्रसाद पुरंदरे, श्रीधर प्रसाद भावे, मनोज एरंडे, कल्याण किंकर, संगीतकार राहुल रानडे आणि भूपाल पटवर्धन उपस्थित होते.
केदार फाळके यांनी संभाजी महाराजांविषयी लिहिलेल्या चरित्राचे प्रकाशन राज यांनी यावेळी केले.

ठाकरे “त्या’ वटवृक्षाखाली…
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी भांडारकर संस्थेच्या आवारात एक वटवृक्ष लावला आहे. संस्थेच्या किर्तीप्रमाणे हा वटवृक्षही विशाल झाला आहे. त्याविषयी तेथे माहिती मिळाल्यानंतर या वृक्षाखाली उभे राहून छायाचित्र काढून घेण्याचा मोह राज यांनाही पडला, त्यांनी तेथे छायाचित्र काढून घेतले. शिवाय संस्थेच्या आवारातील अन्य वास्तूंना आणि परिसराला भेट दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.