Raj Thackeray | Sharad Pawar | Rohit Pawar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच महाराष्ट्रात दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे बीडमध्ये पोहचल्यावर ज्या ठिकाणी त्यांचे स्वागत होणार होते, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले होते.
मात्र यावेळी जमावाने सुपाऱ्या फेकत ‘सुपारीबाज- सुपारीबाज’ अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषनांनंतर मनसैनिक आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले विरोधक एकमेकांना भिडले आणि चांगलाच राडा झाला.
या घडलेल्या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाला जोरदार इशारा दिला. ‘माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील यांना कळणार पण नाही’, असा निर्वाणीचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
दरम्यान, अश्यातच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना, रोहित पवार म्हणाले की, ‘राज ठाकरे दिल्लीतून, गुजरातमधून आदेश आले की तसंच वागायला लागतात’,
प्रत्यक्षात राज ठाकरे हे नाव युवा नेत्यांमध्ये आणि राजकारणाच्या वर्तुळात नव्यानं प्रवेश करणाऱ्या अनेकांमध्येच कमालीचं लोकप्रिय. रोहित पवारही यास अपवाद नाहीत. पण, सध्या मात्र त्यांची भूमिका काहीशी बदललेली दिसत आहे.
‘मी त्यांचा (राज ठाकरे) फॅन होतो. पण आज महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. अशा पक्षांना सामान्य लोक सुपारीबाज पक्ष आणि सुपारीबाज नेते असं म्हणतात’ अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिरांवर ताशेरे ओढले.
‘राज ठाकरेंनी हिंमत असेल तर फडणवीसांविरोधात यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं केलं आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याब्बदल राज ठाकरेंनी बोलावं’, असं ते म्हणाले.
रोहित पवारांचं ट्विट एकदा पाहाच….
#सुपारीबाज पक्षाला #सुपारी खूपच लागलेली दिसतेय…
पार घायाळ झालेत…पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही तर स्वाभिमानी आहे. कुणाच्याही सांगण्याला भुलणारी नाही, म्हणून केवळ मतं खाणाऱ्या इतर पक्षांनीही याचा विचार करावा. pic.twitter.com/xB30kgXztu
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 11, 2024
काल-परवा पर्यंत केवळ चर्चा होत्या, पण अखेर आज #सुपारीबाज असल्याचे स्वतःच सिद्ध केलं… असो! स्वाभिमान गहाण टाकून #सुपारीबाज पणा केल्यावर वैचारिक दिवाळखोरी #बिनशर्थ सोबत येणारच!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2024