मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. यादरम्यान मनसेने आपली विधानसभेसाठीची 5 वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये तिकीट देण्यात आले आहे. मनसेनं आत्तापर्यंत 85 उमेदवारांची नावे जाहीर केली असून जास्तीत जास्त उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी खालीलप्रमाणे….#विधानसभा_२०२४ pic.twitter.com/IVOWxAfcQg
— Raj Thackeray (@RajThackeray) October 26, 2024
कोणाकोणाला देण्यात आली उमेदवारी?
पनवेल – योगेश चिले
खामगाव – शिवशंकर लगर
अक्कलकोट – मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य – नागेश पासकंटी
जळगाव जामोद – अमित देशमुख
मेहकर – भय्यासाहेब पाटील
गंगाखेड – रुपेश देशमुख
उमरेड – शेखर टुंडे
फुलंब्री – बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा – राजेंद्र गपाट
उस्मानाबाद – देवदत्त मोरे
काटोल – सागर दुधाने
बीड – सोमेश्वर कदम
श्रीवर्धन – फैझल पोपेरे
राधानगरी – युवराज येडुरे