मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीकडून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने राज कुंद्राला 4 तारखेला पुन्हा तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगिलंय. याआधीही राज कुंद्राला ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राज कुंद्रा त्यावेळी उपस्थित राहिला नव्हता.
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच्या सांताक्रुझ येतील घरावर ईडीने छापा टाकला. पोर्नोग्राफी केससंर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केल्याचे समोर आले होते.
काय आहे प्रकरण?
2021 मध्ये 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने मुंबईच्या मालाडमधील मालवणी इथल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. या बंगल्यात अश्लील चित्रपट चित्रीत केले जात असून त्यासाठी मुलींवर दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्या बंगल्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.
या प्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा 3 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार थॉर्प यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुरवणी आरोपपत्रात कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना वॉण्टेड म्हणून घोषित करण्यात आले होते.