#raj kundra arrested : अन्‌ शिल्पा शेट्टीला केले ट्रोल

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर सॉफ्ट पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अटक केली आहे. 

राज कुंद्रावर सॉफ्ट पॉर्न चित्रपट बनविण्यासह तो ऍपवर अपलोड करण्याचाही आरोप करण्यात आला आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्‌टीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

शिल्पा शेट्टी लवकरच “हंगामा-2′ चित्रपटात झळकणार आहे. प्रणिता सुभाष यांनी नुकताच या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यानंतर ट्रोलर्सने शिल्पावर निशाणा साधला. “हंगामा हो गया…’ या गाण्यात प्रणिताशिवाय शिल्पा शेट्‌टी, मीजान आणि परेश रावल दिसत अहे.

एका यूझरने कमेंट करत लिहिले की, हंगामा तर शिल्पा शेट्टीच्या पतिने केला आहे. तर अन्य एकाने लिहिले की, शिल्पालाच हंगामाबाबत विचारा, अशा अनेक कमेंट करत शिल्पा शेट्टीला ट्रोल करण्यात आले.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शिल्पा शेट्‌टी “हंगामा-2′ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. हा चित्रपट 23 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त अहे. यात तिच्यासह परेश रावल, मीजान जाफरी आणि राजपाल यादव मुख्य भूमिका साकारत आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.