मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज राज कुंद्राची न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. यातच आता या प्रकरणात पुन्हा एक नवीन खुलासा समोर आला आहे.
View this post on Instagram
याच वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्र यांनी तातडीने आपल्याकडी सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्यांनी आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
View this post on Instagram
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’या कारणात पोलिसांनी करून चौकशीला सुरुवात केली तेव्हा राज कुंद्रा यांच्या मोबाइलमधील डेटा तपासून पहायला होता. यामध्ये पोलिसांना मोबाईल मधील सर्व माहिती तपासायची होती, मात्र यासाठी या तपासासाठी त्यांनी पोलिसांना दिलेला मोबाईल हा याच वर्षी मार्च महिन्यात विकत घेतल्याचं स्पष्ट झालं.’
View this post on Instagram
संबंधित जुन्या फोन बाबत पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले असते. कुंद्रा यांनी नवीन फोन घेतल्यावर जुना फोन आपण काढून टाकल्याचं सांगितलं. तेव्हापासून राज कुंद्रा हा नवा मोबाइल वापरत असल्याने या मोबाइलच्या तपासातून पोलिसांना फारसे सबळ पुरावे मिळणार नाहीत असं सांगितलं आहे.
दरम्यान, आता राज कुंद्रा यांचा जुना फोन पोलिसांना तपासता येणार नसल्याने त्यांना जुने चॅट, कॉल रेकॉर्ड्स यासारख्या गोष्टींचा तपास करताना अडचणी येणार आहेत.