राज बब्बर यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

File photo

लखनऊ – लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाने काँग्रेसला बहुतेक राज्यात धोबीपछाड दिला आहे. लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे. उत्तरप्रदेशमध्येही काँग्रेसला अपयश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राज बब्बर यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे.

उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय प्राप्त झाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राज बब्बर आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांना फतेपूर सिक्री आणि फारूखाबाद मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)