तमिळनाडूत सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवले

चेन्नई – तमिळनाडू सरकारने शिक्षक, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसह आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 1 वर्षाने वाढ करुन, ते 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे.

पलानीस्वामी यांनी विधानसभेत नियम 110 अंतर्गत ही घोषणा केली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तमिळनाडू सरकारचा हा निर्णय सरकारी, सरकारची मदत असलेल्या शैक्षणिक संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक महापालिका आणि 31 मे 2021 ला निवृत्त होत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षी मे मध्येच तामिळनाडू सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरुन 59 केले होते.

त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यात एका वर्षाने वाढ करण्यात आली आहे. सरकारचा हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होणार असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्व सरकारी आस्थापनांना तो कळवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.