जुन्नर किंवा भीमाशंकरमध्ये विशेष क्‍लस्टर उभारा

संग्रहित छायाचित्र

राजगुरूनगर – राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्‍त शेतमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्‍लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेनेचे उपनेते यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या शेतीप्रधान तालुक्‍यांचा समावेश आहे. हा प्रदेश निसर्ग आणि शेती समृद्ध असून, शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातुन निर्यातक्षम फळे भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. या प्रदेशातील बहुतांश भाजीपाला हा मुंबईसह देशाच्या विविध भागात पाठविला जात आहे. निती आयोगाने सुचविल्याप्रमाणे शेतीमध्ये खासगी आणि परकीय गुंतवणुक वाढीसाठी शेती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे. यासाठी जुन्नर किंवा भीमाशंकर परिसरात तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील फ्लोरिकल्चर पार्कच्या धर्तीवर रसायनमुक्‍त भाजीपाला उत्पादन आणि “निर्यात पार्क’ उभारण्याची नितांत गरज आहे. शेतीतील वाढत्या रसायनांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम दिसु लागले आहेत. यामुळे देशांर्गत आणि परदेशातून रसायनमुक्‍त भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. बाजारपेठेचीही गरज आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी रसायनमुक्‍त भाजीपाला उत्पादन आणि “निर्यात पार्क’ उभारण्याची नितांत गरज आहे. तरी या मागणीचा सकारात्मक विचार करुन तशी शिफारस आपण आपल्या समिती अहवालात करावी असे नमूद करण्यात आले आहे.

निसर्गोपचार केंद्रही उभारा
आंबेगाव तालुका हा आदिवासी बहुल क्षेत्र असून, या ठिकाणी बारा ज्योर्तिलिंगापैकी भीमाशंकर हे एक देवस्थान असून, हा परिसर संरक्षित अभयारण्यात आहे. यामुळे या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक, शिवभक्‍त येत असतात. पर्यटकांची संख्या लक्षात घेता, या परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारणे उचीत ठरेल. तरी भीमाशंकर परिसरात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून निसर्गोपचार केंद्र उभारण्याची शिफारस करावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)