पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मान्सूपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनही हजेरी लावण्याचा अंदाज आहे. पावसाळा म्हटले की रेनकोट, छत्री, शालेय साहित्य यांने बाजारपेठ फूलून जाते. पिंपरी कॅम्पमध्येही पावसाळी साहित्यांने बाजारपेठ फुलली आहे. करोनामुळे शाळा कधी सुरु होणार याबाबत शास्वती नसल्याने अद्याप शालेय साहित्यांची दुकाने बंदच आहेत.
पिंपरी कॅम्पमध्ये पावसाळ्यामुळे बाजारात नवीन वस्तू दाखल झाल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिक, छत्री, रेनकोट यांची खऱेदी करत आहेत. चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंतचे रेनकोट, छत्र्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. लहान मुलांसाठी आकर्षक पद्धतीचे रेनकोट आले आहेत. त्यावर सालाबादप्रमाणे यंदाही कार्टुन्सची क्रेझ बघायला मिळत आहे. विविध रंगाच्या छोट्या, मोठ्या छत्र्या विक्रीस आल्या आहेत.