हैदराबादमध्ये पावसाचा तांडव; मदतीसाठी महेश बाबू सरसावले   

हैदराबाद आणि इतर परिसरात मोठया प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये दुर्घटना घडली.  मुसळधार पासवामुळे या भागातील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

या मुसळधार पावसामुळे १९ जण मृत्युमुखी पडले असून अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच या   परिस्थितीत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने मदतीने हात पुढे केला. त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार तर प्रयत्न करत आहेत. मात्र आता अख्खं टॉलिवूडही त्यांच्या मदतीसाठी धावून आलं आहे.

मिळलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. शिवाय देशभरातील नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

हैदराबादमधील पूरग्रस्तांसाठी आता टॉलिवूडमधूनही मदतीचा पूर आला आहे. टॉलिवूडमधील सुपरस्टार्सनी तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.