#Photos : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पंचगंगेची वाटचाल धोका पातळी कडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) – गेल्या 48 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. पश्चिम घाट माझ्यासह संपूर्ण जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत असून सर्वच नद्यांनी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आलेला आहे. जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा अंशतः संपर्क देखील सुटलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीपात्रात बाहेर आली असून सध्या पंचगंगे ची वाटचाल आता धोका पातळीकडे पातळीकडे सुरू आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव देखील ओसंडून वाहत आहे.

सध्याची पाणी पातळी 39 फुटांवर असून इशारा पातळी धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून नांदगाव प्राथमिक शाळेत तसेच चंदगड तालुक्यातील कोवाडा बाजारपेठेत देखील पाणी शिरले आहे. तर दुसरीकडे बाजार भोगाव बाजारपेठेतही पाणी शिरले असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाजारपेठेत पाच फुटांपेक्षा अधिक पाणी सध्या आहे.

कोल्हापूर- गगनबावडा हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला. त्याबरोबरच कोल्हापूर – आजरा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळं कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरण जवळपास 93 टक्के भरले आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा फटका हा ज्योतिबा मार्गाला देखील बसला आहे. गेल्या वर्षी पावसामुळे हा मार्ग खचला होता यंदाही मुसळधार पावसामुळे हा मार्ग खचल्याने बंद आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.

कोल्‍हापूर जिल्ह्यातील २६ मार्ग बंद…

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 6 राज्यमार्ग व 20 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 26 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्‍यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

स्थलांतर सुरू….

पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्यानंतर आंबेवाडी सह परिसरातील गावांना स्थलांतरित करण्याचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिला आहे. सध्या असलेली अतिवृष्टी अशीच आणखीन काही तास राहिली तर आंबेवाडी सह इतर गावांना स्थलांतरित केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, याबाबतची चाचपणी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र रात्री उशिरा स्थलांतर सुरू केला आहे.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार…

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. दिवस-रात्र सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 93 टक्के पेक्षा अधिक भरलं असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.