भिगवण (वार्ताहर) – यंदा मान्सूनची सुरुवात अगदी वेळेवर झाली होती. केवळ सुरुवातच वेळेवर झाली असे नाही तर दमदार पावसाने झाली. त्यामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे.
येथील महाराष्ट्र बॅंकेच्या माती परिक्षण केंद्राच्या नोंदी नुसार 26 जूनला 2020 रोजी 37 मिमी तर 28 जूनला 23.7 मिमी पाऊस झाला. या हंगामात आज अखेर 253 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी जून 2019 अखेरीस केवळ 37.7 मिमी पाऊस झाला होता.
दरवर्षी भिगवण आणि परिसरात सरासरी सुमार 50 मिमी पाऊस होत असतो. यावर्षी जून महिन्यात झालेल्या पावसा एवढाच पाऊस संपूर्ण पावसाळ्यात झाल्याचीही उदाहरणे आहेत. पावसाच्या दमदार सुरुवातीमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. काही ठिकाणी लागून राहिलेल्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचल्याने ऊस उगवणीवर परिणाम झाला आहे.