पुणे – जुलै आणि ऑगस्टमध्ये धो-धो बरसणाऱ्या पावसाने आता काही प्रमाणात उसंत घेतली आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात फक्त पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी होत आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाणा आणि उत्तर राजस्थानकडे सरकला आहे. तर, कमी दाबाचा पट्टा काहीसा उत्तरेकडे सरकल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहणार आहे. राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होण्यास काही कालावधी लागणार आहे, असा अंदाज आहे.