पुणे शहर, उपनगरांत पावसाची विश्रांती; तापमानात किंचतशी वाढ

पुणे – शहरात दोन दिवसांच्या संततधार पावसानंतर रविवारी पावसानेही “सुट्टी’ घेतली. त्यामुळे दुपारनंतर ऊन आणि ढगाळ वातावरण अनुभवण्यास मिळाले. दिवसभरात 4 मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमाल आणि किमान तापमानातही किंचतशी वाढ झाली होती.

गेल्या चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील पुणे शहर आणि जिल्ह्यासह नाशिक, महाबळेश्‍वर, कोल्हापूर, नाशिक, सांगली भागात जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (दि. 5) मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. त्यामुळे रविवारची सुट्टी पावसातच जाणार असे वाटत होते. मात्र, दुपारपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सूर्यदर्शन झाले. शहरात पुढील दोन दिवस हलक्‍या आणि मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी पडतील. कमाल आणि किमान तापमानात घट होईल, अशी शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.