पिंपरी – काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी हुलकावणी दिली. सकाळी शहर परिसरात धुके पडले होते.
दहा वाजल्यानंतर मात्र कडक ऊन आणि उकाडा जाणवू लागला. यामुळे सायंकाळी पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु पावसाने हुलकावणी दिली. धुके पडू लागल्याने पावसाच्या परतीचा प्रवास सुरु झाल्याचे मानले जात आहे.