चीनमध्ये पुन्हा पावसाचे थैमान; भूस्खलनाच्या घटना, वीजेचे खांब कोसळले; शेकडो मृत्यू

बीजिंग – चीनमध्ये मुसळधार पावसाने पुन्हा एकदा कहर माजवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. काही भागात वीजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला आहे. आतापर्यंत जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांचा विविध दुर्घटनांत मृत्यू झाला आहे.

हेनान प्रांतातील झेंगझाऊ येथे काही पुल आणि बोगदे पावसामुळे बंद करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यातच पुरामुळे चीनमध्ये 292 लोकांचा मृत्यू झाला होता. आताच्या पावसाच्या तडाख्यामुळे 95 प्रवासी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. शान्क्‍सी प्रांतात 24 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेनान, शान्क्‍सी सिचुआनमधील जवळपास 25 राज्यमार्ग बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने दुकाने, बाजारपेठा बंद आहेत. चीनमध्ये गेल्या आठवड्यातही जोरदार पाऊस कोसळला होता. त्यात हुबई प्रांतात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रांतात 503 मिमी पाऊस झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.