पुणे – खडकवासला धरणसाखळी परिसरात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे.
सध्या खडकवासला धरणामधून 18 हजार 491 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. तर टेमघर धरणातून 2 हजार 576 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. रविवारी (दि. 11) दिवसभर या चारही धरणांच्या परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. यात खडकवासला- 2, पानशेत-13, वरसगाव-14 आणि टेमघर धरण परिसरात 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चारही धरण शंभर टक्के भरली असून, पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढविण्यात येईल. दरम्यान, खडकवासला धरणातून सकाळी 9 वाजता 22 हजार 624 क्युसेकने विसर्ग सुरू होता.