कोयनानगर, ( वार्ताहर ) – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात पुन्हा साडेचार टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 54 हजार क्युसेक असून धरणात 56. 87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
रविवारी दिवसभर धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 80/2473 मिमी, नवजा येथे 112/2959 मिमी, तर महाबळेश्वर येथे 145/2404 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पाणलोट क्षेत्रात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 54 हजार 239 क्युसेक झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात साडेचार टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2115.00 फूट झाली असून धरणात 56.83 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.