मुंबईसह कोकणात पुन्हा पावसाचा जोर

मुंबई – मुंबईसह कोकणात अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाउस पडत आहे. मुंबई आणि उपनगरांतही आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मरिन ड्राईव्ह येथे दोन जण बळी
मरिन ड्राईव्हवर उंच लाटा उसळल्या आहेत. लाटांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांना लाटांनी समुद्रात ओढले गेले. ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दुपारी अडीचच्या सुमारास मोठी भरती होती. त्या वेळी एक जण लाटेबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली. दोघेही भरतीच्या लाटांमध्ये वाहून गेले बुडालेल्यांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. नेव्ही आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. समुद्रात उंट लाटा उसळल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. बचाव कार्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे.

ठाणे, डेंबिवलीतही पावसाने हजेरी लावली आहे. दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्‍या सरी पडत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या.

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले 3 दिवस जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 7 जुलैपर्यंत देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढच्या 24 तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामानाची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल असून मान्सून वेगाने पुढे जाऊ शकतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×