सतरंगी रे…! एकाच वेळी दोन इंद्रधनुष्याचे दर्शन

कुरकुंभ: कुरकुंभ औद्योगिक नगरी मध्ये दोन दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. कुरकुंभ या ठिकाणी एमआयडीसी असल्याने कुरकुंभ गावाचे नाव राज्यभर प्रसिद्ध आहे,सकाळ पासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते, अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने सुरवात केली व काही क्षणात भर पावसात ऊन पडल्याने पाऊस व उन्हाचा खेळ सुरू झाला.अशा या नैसर्गिक ऊन-पावसाच्या खेळात कुरकुंभ मध्ये अनेकांना दोन-दोन इंद्रधनुष्य एकाच वेळी दिसले,त्यामुळे नेहमी प्रदूषणासाठी चर्चित असलेल्या कुरकुंभ करांना आज निसर्गाचा वेगळा अनुभव पाहायला मिळाला.

दौंड तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने काही गावात चांगला पाऊस बरसत आहे.त्यामुळे येथील शेतकरी सुखावला आहे.मागील काही दिवस पावसाने या भागात दांडी मारली होती,मात्र या दोन दिवसात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखवल्याचे दिसत आहे.अर्ध्या तासाहून झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाली होती,अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून पाणी वाहताना दिसत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.