मुंबई – मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज सुरेश रैना याने करोनाच्या भीतीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा निरोप घेत स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, आता त्याने सराव सुरू केल्यामुळे तो आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी चेन्नई संघात पुनरागमन करत अमिरातीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यापूर्वी त्याला बीसीसीआय परवानगी देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही स्पर्धा यंदा येत्या 19 सप्टेंबरपासून अमिरातीत सुरू होणार असून काही दिवसांपूर्वी चेन्नई संघातील दोन खेळाडूंसह एकूण 13 सदस्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे रैनाने ही स्पर्धा न खेळता मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.