शहरातील अनेक वसाहतीत पावसाचे पाणी घुसले

पुणे – पुण्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. काञज, नवीन वसाहत येथे राञीच्या पावसाने अनेक भागात पाणी शिरले.

काल राञी 12 च्या पुढे सुरू झालेल्या पावसामुळे येरवङा-शांतीनगर, घोरपङी गाव, वानवङी-आझादनगर, बी.टी.कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड येथे घरामध्ये पाणी शिरले. दरम्यान, या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचे पहायला मिळत आहे.

पद्मावतीच्या गुरुराज सोसायटीमध्ये पहाटे पुन्हा पाणी घुसले. पाच इमारतीच्या तळमजल्यावरील सदनिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे. सोसायटीची सीमा भिंत आधीच्या पावसात कोसळल्यामुळे तेथूनच पाणी पुन्हा सोसायटीत घुसले आहे. दरम्यान, अग्निशमन दल शहरातील विविध वसाहतींमध्ये दाखल झाले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.