धानोरीत घरात घुसले पावसाचे पाणी

रस्त्यावरही ठिकठिकाणी पाण्याचे लोट : गैरसोयीमुळे नागरिकांचे मात्र हाल

विश्रांतवाडी धानोरी-विश्रांतवाडी मुख्य रस्त्यावर मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. तर शनिवारी परांडेनगरमधील घरांमध्ये व लक्ष्मीनगर सोसायटीत पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. धानोरी जकातनाका, लक्ष्मीनगर, हंसनगरमधील डॉ. आंबेडकर विद्यालय, कलवडवस्तीतील गणराज चौक, मुंजाबावस्तीतील धनेश्‍वर विद्यालय व “विमान बिल्डिंग’ इत्यादी ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते.

मुंजाबावस्तीत नाल्याच्या प्रवाहात पडलेले झाड अडकल्याने नाल्यातील पाणी निवासी भागात शिरण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पालिका कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने हे झाड बाजूला करून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

नगरसेवक अनिल टिंगरे, प्रशांत परांडे व धनंजय जाधव यांनी परांडेनगरमध्ये घरात पाणी शिरलेल्या भागाला भेट दिली. त्यांनी नागरिक व जेसीबीच्या मदतीने साठलेल्या पाण्याला वाट करून दिल्याने घरात शिरलेले पाणी ओसरले. दरम्यान, पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती अधिकाऱ्यांचया निदर्शनास आणून उपाययोजना करणार असल्याचे अनिल टिंगरे यांनी सांगितले. तर, अशा परिस्थितीचा जाब अधिकाऱ्यांना विचारणार असल्याचे रेखा टिंगरे म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.