राधनागरीतील वर्षा पर्यटन अनिश्चित काळासाठी बंद…

कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉईंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. यात राधानगरी धरण, दूधसागर धरण, राधानगरी अभयारण्य सह राउतवाडी धबधबा सहीत अनेक धबधब्याचा समावेश आहे. राधानगरी येथें झालेल्या महसूल,पोलीस,वन व स्थानिक ग्रामस्थांच्या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला.

राधानगरी परिसरात अनेक गावांत कोरोनो रुग्ण आढळले आहेत तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही नियंत्रण राहू शकणार नाही त्यामुळे तालुक्यातील धबधबे,धरणे, अभयारण्य अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच नियम मोडून कुणी या ठिकाणी आढळून आल्यास  त्यांच्यावर पोलीस व वन खात्यातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटकांना या मान्सून चा आनंद घेता येणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.