पुण्याला पावसाचा ‘रेड अलर्ट’

मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – वातावरणीय बदलाची स्थिती लक्षात घेत, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी “रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मुख्यत: घाट माथ्यावर सर्वाधिक पाऊस पडेल, तर शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

सोमवारच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यासहित मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात प्रामुख्याने घाटमाथा परिसरात तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असून, शहरात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.