पावसाने उघडीप दिल्याने दिलासा, पण…

पुणे – दोन दिवसांपासून पावसाने पुणे शहराबरोबरच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उमेदवारांना प्रचार आटोपता घ्यावा लागला. तर अनेक स्टार प्रचारकांना प्रचारात सहभागी होता आले नाही. याशिवाय लोकसभा निवडणुकीत पुण्यात नीचांकी मतदान झालले होते. सर्वच राजकीय उमेदवारांनी या निचांकी मतदानाची मोठी धास्ती घेतली होती.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने पथनाट्य, महाविद्यालयांमध्ये मतदानाचे प्रात्यक्षिक, दिव्यांगांकरिता स्वतंत्र व्यवस्था, मतदारांना घरोघरी स्लीप वाटप यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. याकरिता लाखो रुपये खर्च होतो. तर काही खासगी व्यावसायिकांनीदेखील मतदान करणाऱ्या नागरिकांना खाद्यपदार्थांच्या बिलात सवलत दिली होती.

पगारी सुट्टीमुळे उत्साह
मतदानासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच कंपन्या व खासगी आस्थापनांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बहुतांशी सर्वच आस्थापना बंद होत्या. तर काही कंपन्या व आस्थापनांमधील कामगारांना मतदानाकरिता कामावर काही तास उशिरा येण्याची सवलत देण्यात आली होती. त्यामुळे पावसाचे सावट दूर झाल्यानंतर घरी बसलेला मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र पहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.