शहरात पुन्हा पाऊस; काही काळ जनजीवन विस्कळीत

नगर – महालक्ष्मी सणासाठी बाजार गर्दीने चांगला फुलला असतांना आज शहरात दुपारी 1 च्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने सुमारे दोन तास शहराला चांगलेच झोडपले त्यामुळे महालक्ष्मीच्या सणाच्या खरेदीत थोडासा व्यत्यय आला. मात्र पाऊस थांबल्या नंतर पुन्हा गर्दीने जोर धरला .

आज अचानक सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेचा कारभार उघड्यावर पाडला. रस्त्यात जागोजागी पडलेले खड्डे त्यात सखल भागात पाणी साठलेले असल्याने त्यातून वाहने काढतांना नगरकरांची चांगलीच पंचाइत होत होती. पावसाने संततधार स्वरूपधारण केल्याने पाऊस उघडण्याची वाट पहात प्रत्येक जण अडकून पडल्याचे चित्र पहायला मिळाले.

शहरातील तेलीखुंट, झेंडीगेट, भागातून पाणी चितळे रस्ता, गांधी मैदान, मार्गे पटवर्धनचौकात आणि गौरीघुमट भागात शिरल्यामुळे याभागात मोठा जलाशय साठला होता. चितळे रस्त्यावरील महालक्ष्मीच्या भरलेल्या बाजार उठवावा लागला त्यामुळे तेथे रस्त्यावर दुकाने थाटलेल्या दुकान दारांची एकच धावपऴ झाली. तर गणेशोत्सवासाठी घातलेल्या मंडपांच्या दोनतीेन पायऱ्या पर्यंत पाणी साठल्याचे चित्र गौरी घुमट, पटवर्धन चौकात पहायला मिळाले.हे पाणी ओसरंण्यासाठी सुमारे सोन ते अडीच तास लागल्याने सणावारात जनजीवन काही वेळापुरते विस्कळीत झाले होते. सावेडी आणि केडगाव परीसरातही चांगल्याच सरी बरसल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)