सोमेश्वरनगर – तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने सायंकाळी पाच वाजता चांगलीच हजेरी लावली. शेतात व रस्त्यालगत पाणी साचले आहे. आधीच कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट झाला असताना आणखी अवकाळी पावसाची भर पडली आहे. बारामती तालुक्यात अचानक आलेल्या बुधवार दि २५ ला सुरवात झाली नंतर चार दिवसाच्या विश्राती घेत रविवार दि २९रोजी सायंकाळी पाच ला वदली वाऱ्यासह चांगलाच एक तास पावसा झाला.झालेल्या पावसाने वातावरणात बराच गारवा निर्माण केला.
कोरोना व्हायरसला हे थंड वातावरण अनुकूल ठरु शकते, असं अनेक जाणकार सांगत आहेत. त्यामुळं थोडा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यातच पिकांचे होणारे नुकसानाने शेतकऱ्यांना दुहेरी झटका बसतो आहे. सध्या राज्यात एकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. या पावसाने ऐन गहू व इतर काढणीला आलेलं शेतकऱ्याच्या हातातलं पिक वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे.