पुणे: पुण्यात पावसाचा तांडव अजूनही सुरू आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे इथले जनजीवन विस्कळित झाले आहे. काही वेळातच रस्त्यावर पाण्याचे पाट वाहु लागले आहेत. नागरिकांनी सुद्धा कुठलाही धोका नकाे म्हणून वाहने रस्त्यावर सोडून आडोसा शोधला.
मान्सून परतीचा काळ आता सुरु झाल्याने हा पाऊस पडत आहे. दिवसा उकाहा होतो आणि संध्याकाळी जोरदार पावसाच्या सरी येत आहे. काल रात्री सुद्धा पावसान हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. कोथरुड,सिंहगड रस्ता,कात्रज,धनकवडी,स्वारगेट आणि शहराच्या मध्यवस्ती भागात पावसाचा जोर अधिक होता. सध्या निवडणूकीचे वातावरण आहे. या पावासामुळे प्रचारावर मात्र पाणी फिरले जात असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी पसरत आहे.
वेधशाळेच्या माहितीनुसार पुण्यावर 15 किमी उंचीचे ढग आहेत. त्यामुळे कमी वेळेत मोठा पाऊस शक्य आहे. त्यामुळे काही भागात गारपीटही झाली आहे