अकोले -अकोले तालुक्याच्या पूर्व भागात आज दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी लागली. कालही तालुक्याच्या काही भागात बिगर मोसमी पावसाने हजेरी लावली होती. समशेरपूर येथे गारांचा पाऊस, तर कोतूळ येथे बिगर मोसमी पावसाने पिकांची भरणी केली होती.
अकोले तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात हे पावसाचे चित्र राहिले.अकोले तालुक्याच्या सर्व भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आज व काल अचानक बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आज रस्ते चिखलाने भरून गेले. समशेरपूर भागामध्ये समशेरपूरला काल पावसासहित जोरदार गारांची वृष्टी झाली. आज सायंकाळी साडेसहा ते पावणेसात दरम्यान पावसाने हजेरी लावली. मात्र ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट आज नव्हता. तर काल सायंकाळी चार नंतर ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट झाला. यामध्ये अवेळी आणि अचानक पावसाळी वातावरण तयार झाले.
त्याचबरोबर हलकासा बऱ्याच ठिकाणी शिडकावा झाला. त्यामध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील भंडारदरा व निळवंडे या धरणांच्या पाणलोटामध्ये हलकीशी वृष्टी झाली. तर तालुक्याच्या इतर भागांमध्येही अंगणात सडा पडावा अशा प्रकारचा हलका पाऊस हजेरी लावून गेला.
समशेरपूर येथे काल जोरदार पाऊण तास पावसाची हजेरी लागली. त्यात गारांचा वर्षाव झाल्याची तास पावसाची हजेरी लागली, असे प्रदीप भाटे यांनी सांगितले. माहिती शिवाजी कदम यांनी दिली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. कोतूळ येथे काल तब्बल पाऊण दोन दिवस झालेल्या या पावसामुळे गहू त्याचबरोबर कांदे आणि अन्य पिकांच्या साठी झाकपाकीला शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली.