गॅले -श्रीलंका आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेस आज पासून सुरूवात झाली आहे. सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाचा प्रभाव राहिला असून आज केवळ 68 षटकांचा खेळ होऊ शकला. गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने 5 बाद 203 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
Rain forced early Stumps on Day 1 at Galle,
Akila Dananjaya 5/57, Ross Taylor 86*, Mitchell Santner 8* #SLvNZ pic.twitter.com/WTisjNgCR2— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) August 14, 2019
शेवटच्या सत्रात आलेल्या पावसामुळे परत खेळ सुरू होऊ न शकल्यामुळे पंचानी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा खेळपट्टीवर रॉस टेलर 86 रन आणि मिचेल सेंटनर 8 धावांवर नाबाद आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. न्यूझीलंड संघाच्या पाच ही फलंदाजाना श्रीलंकेचा फिरकीपटू गोलंदाज अकिला धनंजय यांनी बाद केलं आहे. अकिल धनंजय याने 22 षटकांत 57 धावा देत 5 गडी बाद केले आहेत.