पुणे – शहर आणि परिसरामध्ये पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली होती.
दि. 4 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती.
दि.5 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाट, दि. 6 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.