रेल्वेने केले 75 लाख रुपये “रिफंड’

पुणे – मुंबईतील पाऊस, रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड, वाहून गेलेला भराव, साचलेले पाणी अशा एक ना अनेक कारणांमुळे रेल्वे वाहतूक सातत्याने विस्कळीत आहे. परंतु, यामुळे प्रवाशांचे नाहक नुकसान झाले. त्यावर आता प्रशासनाने सुमारे 75 लाख रुपये “रिफंड’ केले.

रेल्वे प्रशासनाच्या नियमाप्रमाणे गाडी रद्द झाल्यास प्रवाशांना रेल्वे रद्द झाल्यास त्याचे पैसे परत केले जातात. त्यानुसार दि. 2 ते 7 ऑगस्ट दरम्यानच्या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे करण्यात आले असून अन्य प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे “रिफंड’ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुणे विभागाने दि. 2 ते 7 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 74 लाख 83 हजार 911 रुपये प्रवाशांना परत केले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here