नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेली रेल्वे तिकिटे देणाऱ्य़ा दोन कर्मचाऱ्यांचे रेल्वे प्रशासनाने निलंबन केले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे रल्वेच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाकडून याची दखल घेण्यात आली.
मोदींचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्याने रेल्वे मंत्रालयाने आचारसंहितेचा भंग केल्याचे समोर आले होते. निवडणूक आयोगाकडून प्रचारात भारतीय सैन्याचा उल्लेख करू नका, असे सांगितले होते. तरीही, पंतप्रधान मोदी सैन्याच्या नावावर आपल्या सभेत मत मागताना दिसत आहेत असा आरोप होत आहे.
लखनौपासून 30 किमी अंतरावर असलेल्या बाराबंकी शहरात एका व्यक्तीने रविवारी रेल्वेचे तिकीट काढले. त्यावर मोदींचा फोटो आणि सरकारी योजनेची माहिती देण्यात आली होती. संदर्भात मोहम्मद शब्बीर यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना दमदाटी करून पिटाळून लावण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे प्रशासानाने पंतप्रधान मोदींचा फोटो असलेले तिकीट मागे घेण्याचे सांगितले होते. अशा प्रकारची तिकिटे वितरीत केली जाऊ नये यासाठी सचूना जारी करण्यात आल्या आहेत.