रेल्वे प्रवाशाचे सोने चोरणाऱ्यांना अटक

पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवरील ओव्हरब्रीजवरून रेल्वेकडे जात असलेल्या प्रवाशाचे मंगळसूत्र आणि सोन्याचे पेंडल चोरल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजूमदार यांनी त्यांची 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

किरण मधुकर माने-पाटील (22, रा. शिवाजी चौक, पिंपळगाव, लातूर) आणि सतीश रामराव मोरे (21, रा. पिंपळगाव सय्यद, परभरणी) असे कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी रईसा मजीद मन्सुरी (40, रा. नवीन पाण्याच्या टाकीजवळ, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. 20 मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास फिर्यादी या त्यांच्या मुलीबरोबर पुणे स्टेशनवरील ओव्हरब्रीजवरून प्लॅटफॉर्म नंबर चारवर चालल्या होत्या. गाडी पकडण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादी यांचे मंगळसूत्र आणि मुलीच्या गळ्‌यातील सोन्याचे पेंडल असा एकूण 22 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरला. यापुढील तपासासाठी आरोपींनी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील डी. एल. मोरे यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)