हावड्यात रेल्वे स्थानकाची नासधूस

कोलकाता : नागरिकत्व सुधारणा विधेयला विरोध करण्यासाठी निदर्शकांनी प. बंगालमध्ये हावडा जिल्ह्यातील उलूबेरीया रेल्वे स्थानकाची नासधूस केली. काही रेल्वे गाड्यांचे नुकसान केले. निदर्शकांच्या दगडफेकीत रेल्वेचा एक चालक जखमी झाला.

हा गोंधळ दुपारी तीन वाजून 22 मिनिटांनी सुरू झाला. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही रेल्वे सेवांवर त्याचा परिणाम झाला. हावडा चेन्नई कोरोमंडल एक्‍सप्रेसवर निदर्शकांनी तुफानी दगडफेक केली. त्यात त्याचा चालक जखमी झाला.

य ास्थानकावरील प्लॅटफॉर्मही उद्‌ध्वस्त करण्यात आले. हमसफर एक्‍सप्रेसच्या रिकाम्या बोगीचीही नासधूस करण्यात आली. या घटनांत अद्याप कोणी प्रवासी जखमीं झाल्याचे वृत्त नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारकडे मदत मागितली आहे, असे दक्षिण पूर्व रेल्वेचे प्रवक्ते संजय घोष यांनी स्पष्ट केले.

हावडा खरगपूर रेल्वे मार्ग रोखून धरला. रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले. त्यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे आणि उपनगरीय रेल्वेसेवा खोळंबली. दरम्यान निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रोखून धरला.

Leave A Reply

Your email address will not be published.