नवी दिल्ली – देशात मागील काही दिवसांपासून वाढणारा करोना रुग्णांचा आकडा आणि त्या पार्श्वभूमीवर उचलली जाणारी पावलं पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याच्या अनेक चर्चांनी जोर धरला.
मुळात या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, या चर्चा मात्र अनेकांच्याच मनात भीती आणि असंख्य प्रश्न निर्माण करत आहेत.त्यातच आता डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून रेल्वे सेवा बंद करण्याच्या चर्चाही सुरू झाल्याचे कानावर येत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातील काही मेसेजही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 1 डिसेंबरपासून विशेष रेल्वे गाड्यांसह इतरही रेल्वे बंद केल्या जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ज्याबाबत आता खुद्द रेल्वे मंत्रालयाकडूनच खुलासा करण्यात आला असून याचा स्पष्ट शब्दांत इन्कारही करण्यात आला आहे. असा कोणताही निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला नाही. त्यावर चर्चासुध्दा झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा