रेल्वे प्रवासी वैतागले; अनेक गाड्या रद्द

मुंबई-पुणे रेल्वे मार्ग विस्कळीत 

पुणे -कर्जतजवळील जामरुंग येथे मालगाडीचे सहा डबे घसरल्याने सोमवारपासून मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जामरुंग ते ठाकूरवाडीदरम्यान डाऊन लाइन बंद ठेवण्यात आल्याने सोमवारी अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले होते. यासह मुंबईतील संततधार पावसामुळे देखील रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. याचा परिणाम मंगळवारीदेखील झाला. गाड्यांच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे नाहक हाल झाले.

हुबळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस, कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्‍स्प्रेस, हैदराबाद ते मुंबई एक्‍स्प्रेस, चेन्नई ते दादर (चेन्नई एक्‍स्प्रेस), पुद्दुचेरी ते दादर एक्‍स्प्रेस, हैदराबाद ते मुंबई एक्‍स्प्रेस, कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्‍स्प्रेस या गाड्या केवळ पुण्यापर्यंत धावल्या.

तर मुंबई ते भुवनेश्‍वर कोणार्क एक्‍स्प्रेस, दादर-चेन्नई (चेन्नई एक्‍स्प्रेस), दादर ते तिरुनेलवेली एक्‍स्प्रेस, मुंबई ते हैदराबाद एक्‍स्प्रेस, मुंबई ते हैदराबाद एक्‍स्प्रेस, मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस, मुंबई ते कन्याकुमारी एक्‍स्प्रेस, मुंबई ते भुवनेश्‍वर कोनार्क एक्‍स्प्रेस, हुबळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस या गाड्या पुणे स्थानकातून सुटल्या. यासह भुवनेश्‍वर ते मुंबई कोनार्क एक्‍स्प्रेस कामशेत स्थानकापर्यंत धावली. सोलापूर ते मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस, लातूर ते मुंबई एक्‍स्प्रेस, कोईम्बतूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस या गाड्या दौंडपर्यंत धावल्या. मुंबई ते बंगळुरू उद्यान एक्‍स्प्रेस दौंड स्थानकातून सुटली. कन्याकुमारी ते मुंबई एक्‍स्प्रेस तळेगाव स्थानकापर्यंत धावली.

पुणे-मुंबई रेल्वेगाड्या आजही रद्द
मुंबई ते पुणे मार्गावरील इंटरसिटी, सिंहगड, प्रगती आणि डेक्कन एक्‍स्प्रेस रद्द बुधवारी (दि.3) करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले असून काही लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेस आणि पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे-भुसावळ-पुणे गाडीचा मार्ग दौंड-मनमाडमार्गे बदलण्यात आला आहे. नांदेड-पनवेल गाडी पुणे-मुंबई भागात रद्द करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.